नागपुरी गेट येथील मनपा प्राथमिक हिंदी शाळा क्र. १२ च्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

अमरावती : मनपा प्राथमिक हिंदी शाळा क्र. १२, नागपुरी गेट येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप सोडली आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण परिसरात समाधानाची आणि अभिमानाची भावना आहे.
उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे –
🔹 जैन खान अजीम खान
🔹 सैय्यद अरहान सैय्यद मोसिन
🔹 शेख साद शेख शकील
🔹 मोहम्मद उजैर मोहम्मद फ़िरोज़
🔹 मसीरा फिरदोस अब्दुल साजिद
🔹 आयशा फातेमा कलीम खान
या विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासातून आणि जिद्दीने हे यश मिळवले आहे. त्यांचं यश म्हणजे शिक्षकवृंद, पालक आणि शाळेच्या व्यवस्थापनाच्या एकत्रित प्रयत्नांचं फळ आहे.
मुख्याध्यापिका कु. वंदना फुंदे यांचे नेतृत्व, आणि शिक्षक स्वप्निल रंगारी, संतोष साहू, गणेश सावंत, मेघा घाटोल, योगिता भालेकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यशाच्या वाटेवर घेऊन गेले.
म.न.पा. शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.