नागपूरच्या नंदनवन परिसरात NDPS पथकाची कारवाई; अंमली पदार्थासह एक आरोपी अटकेत

नागपूर : नंदनवन पोलिस ठाणे हद्दीतील शास्त्रीनगर NIT ग्राउंड, वाठोडा टी-पॉईंटजवळ NDPS पथकाने ६ मे २०२५ रोजी सकाळी ६:०० ते ७:३० दरम्यान अंमली पदार्थविरोधी मोहिम राबवून एक आरोपी अटक केला आहे.
गुन्हा क्र. 202/2025 हा NDPS कायदा कलम 8(क), 22(ब), 29 अंतर्गत नोंदवण्यात आला असून, अटक करण्यात आलेला आरोपी विजय नंदलाल रहांगडाले (वय ४३), रा. संघर्ष नगर, वाठोडा रिंग रोड, नागपूर हा पूर्वीपासून 302, 392, 397, 379 IPC अंतर्गत १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
घटनेचा तपशील:
NDPS पथक गस्तीदरम्यान वाठोडा परिसरात संशयित हालचाली लक्षात घेऊन विजय रहांगडाले यास त्याच्या मोपेडजवळ थांबवून तपासणी केली. पंचासमक्ष झडतीदरम्यान त्याच्याजवळ २० ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) पावडर, १ मोबाईल फोन, १ मोपेड दुचाकी, रोख रक्कम, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि Ziplock पिशव्या असा एकूण ₹2,03,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फरार आरोपींची नावे:
शाहिद शेख, रा. यशोधरा नगर, नागपूर
प्रेमा राजेश गौर, रा. शास्त्रीनगर, नागपूर
प्राथमिक चौकशीत अटक आरोपीने कबूल केले की, तो अंमली पदार्थ शाहिद शेख याच्याकडून घेऊन प्रेमा गौर हिला देणार होता. सदर प्रकरणात दोन्ही फरार आरोपींविरोधातही कारवाई सुरू करण्यात आली असून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर पोलिसांचे अंमली पदार्थांविरोधातील हे पाऊल हे शहरातील ड्रग नेटवर्क मोडीत काढण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.