मनपा सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांनी घेतली साफ सफाई बाबत सभा

अमरावती : रामपुरी कॅम्प येथे स्वच्छतेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण आढावा सभा आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांनी भूषवले.
बैठकीत झोनमधील ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक राजु डिक्याव यांच्यासह सर्व स्वास्थ निरीक्षक उपस्थित होते. यावेळी शहरातील स्वच्छता व्यवस्थापन सुधारण्यासाठी विविध महत्त्वाच्या बाबींवर निर्देश देण्यात आले.
सहाय्यक आयुक्त तिखिले यांनी दिलेले निर्देश पुढीलप्रमाणे होते:
परिसरात विशेष साफ-सफाई मोहीम राबवावी.
रस्त्यांवरील कचरा गोळा करून घंटागाडीत टाकण्याचे आदेश.
नाल्यांतील गाळ काढून वाहते करणे आवश्यक.
परिसरातील नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबवावी.
इतरत्र कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
परिसरात प्लास्टिक जप्ती मोहीम प्रभावीपणे राबवावी.
नागरिकांना क्यू.आर. कोड चा वापर करण्याबाबत सूचित करावे.
सदर उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित आरोग्य निरीक्षकांना कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले असून, रामपुरी कॅम्प परिसरात लवकरच या मोहिमेची अंमलबजावणी सुरु होणार आहे.