‘काश मैं भी मारा जाता’, दहशतवादी मसूद अझहर ढसाढसा रडला, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये अख्ख्या कुटुंबाचा खात्मा!

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 सदस्यांनाही ठार मारण्यात आलं. दहशतवादी मसूद अझहरनं एक पत्रक जारी करून म्हटलंय की, भारताच्या हल्ल्यात मी ही मेलो असतो तर बरं झालं असतं. तसेच, भारत आता कुणाची दया करणार नाही,असंही मसूदनं म्हटलं आहे.
कुख्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा केलाय. यात हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरचा भाऊ शतवादी भाऊ रौफ असगर गंभीर जखमी झाला आहे. रौफ असगरचा मुलगा हुजैफाचाही यात समावेश आहे. तर अझहरचा भाऊ रौफ असगरच्या भावाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. यात आणखी पाच जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रौफ असगर हा भारतातील मोस्ट मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे.
पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारतीय हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीणही ठार झाली आहे. या हल्ल्यांमध्ये घोषित दहशतवाद्यांचे नातेवाईकही मारले गेले. भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या पंजाब आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर हल्ला केला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पाकिस्तानच्या पंजाबमधील 4 आणि पीओकेमधील 5 ठिकाणी हल्ले करण्यात आले.
मसूदच्या कुटुंबीयांवर आजच अत्यंसंस्कार
जैश-ए-मोहम्मदनं एक पत्रक जारी करून म्हटलंय की, मौलाना मसूद अझहरच्या मोठ्या बहिणीसह मौलाना कशफचं संपूर्ण कुटुंब मारलं गेलंय. मुफ्ती अब्दुल रौफ यांची नातवंडं, बाजी सादियाचे पती आणि त्यांच्या मोठ्या मुलीची चार मुलं जखमी झालीत. कुटुंबातील बहुतेक महिला आणि मुलं मारली गेली आहेत. दहशतवादी अझहरच्या कुटुंबातील सदस्यांवर आज बुधवारी (7 मे 2025) अंत्यसंस्कार केले जातील.
जैश-ए-मोहम्मदच्या प्रमुखाचा हवाला देत बीबीसी उर्दूनं वृत्त दिलंय की, अझहरचा एक जवळचा सहकारी, त्याची आई आणि इतर दोन जवळचे सहकारी देखील भारतीय हल्ल्यात मारले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत बहावलपूरमधील सुभान अल्लाह कंपाऊंडवरही हल्ला करण्यात आलाय.
मसूद अझहरनं पत्रकात नेमकं काय म्हटलंय?
अल्लाह तआलाचे काही खास लोक असतात… जे शहीद होतात, ते म्हणजे अल्लाहचे पाहुणे बनतात. माझ्या कुटुंबातील पाच जणांना ही खास संधी मिळाली… रात्रीच्या वेळी त्यांना ही शहादत मिळाली. पाच निष्पाप लहान मुलं, माझी आई जी खूप आजारी होती, माझे वडील, माझी बहीण आणि तिचा पती – सगळे या अपघातात शहीद झाले.
माझ्या आईला कॅन्सर होता. ती अनेक दिवस आजारी होती. तिने मला सांगितलं होतं की, “माझ्या मृत्यूनंतर मला तुमच्या वडिलांजवळ दफन करा.” आणि आश्चर्य म्हणजे ती आपल्या पतीजवळच दफन झाली, दोन महिने अगोदरच. हे खूप मोठं नशीब होतं.
एका अनुभवी माणसाने सांगितलं की, “हे निष्पाप मुलं, आई-वडील, बुजुर्ग लोक – हे सगळे खास होते. त्यांचा मृत्यू अचानक झाला पण त्यांच्या नशिबात हे लिहिलं होतं. त्यांचं शहिद होणं ही मोठी गोष्ट आहे. अल्लाहने त्यांना आपले पाहुणे बनवले.”
हे “चौधरी” नावाचं कुटुंब तीन वर्षांपासून हजला जायचा प्रयत्न करत होतं. व्हिसा मिळत नव्हता. पण यावेळी त्यांना व्हिसा मिळाला आणि संपूर्ण कुटुंब हजसाठी गेलं. आणि अल्लाहच्या घरात पोहोचल्यावर त्यांचा मृत्यू झाला. ही खूप मोठी गोष्ट आहे. अशी वेळ खूप कमी लोकांच्या नशिबात येते.
“मोत्वी” नावाच्या व्यक्तीने सांगितलं – हा अपघात, हे बलिदान संपूर्ण जगासाठी एक मोठा धडा आहे. शहीद झालेल्यांचा त्याग, त्यांचं बलिदान – हे सगळं इतिहासात कायम राहणार आहे.
आज त्यांच्या जनाजाची (अंत्यविधीची) नमाज हरम शरीफमध्ये होणार आहे. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. ईमान, पश्चात्ताप आणि माफी मागण्याची अशी संधी फार थोड्यांना मिळते…