धारणीमध्ये डॉ. रामदासजी आंबटकर यांना श्रध्दांजली आणि नवनियुक्त अध्यक्षांचा सत्कार सोहळा उत्साहात पार

धारणी : भारतीय जनता पक्ष, मेळघाट विधानसभा तर्फे धारणी शहरात आज एक भावनिक आणि प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला. डॉ. रामदासजी आंबटकर यांना श्रध्दांजली अर्पण करत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तसेच नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास भाजपचे विविध स्तरांतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये डॉ. उपेंद्र कोठेकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव जयंत दादा डेहनकर, आमदार केवलराम काळे, जिल्हा उपाध्यक्ष अप्पा पाटील, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, रवी नवलाखे, शमाताई चौकसे, जया खंडारे, मालतीताई कास्देकर यांचा समावेश होता.
नवनियुक्त अध्यक्ष विवेक नौलाखे (धारणी), चिखलदरा तालुकाध्यक्ष आलोकार, दीनोश चव्हाण, वेदांत सुरपाटने, गजु सुरळकर, शिवलाल शेलेकर, समीर आळे आदींचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षकार्य निष्ठेने आणि सेवाभावाने करण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे आयोजन आणि समन्वयाचे कार्य जिल्हा उपाध्यक्ष अप्पा पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले.
या संपूर्ण कार्यक्रमातून एकता, श्रद्धा आणि कार्यनिष्ठेचे दर्शन घडले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.