पाकिस्तानवर एअर स्ट्राईक; भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय

पाकिस्तानी दहशतवादाला भारताने आज मोठा दणका दिला. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारतीय लष्कराने आज पत्रकार परिषद घेत आज या संपूर्ण हल्ल्याची माहिती पुराव्यांसह दिली. पाकव्याप्त काश्मिरातील 5 आणि पाकिस्तानातले 4 दहशतवादी तळ भारताने बेचिराख केले.
भारतीय लष्कराने आज (7 मे) मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटांनी हल्ल्याला सुरूवात केली. तर 1 वाजून 30 मिनिटांनी भारतीय लष्कराने ही मोहीम फत्ते केली. बरोबर 25 मिनिटांत ही कारवाई भारताने यशस्वीरित्या पूर्ण केली. आर्मीच्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत संपूर्ण माहिती दिली. या हल्ल्यात एकाही पाकिस्तानी रहिवासी विभागाला किंवा पाकिस्तानी लष्काराच्या तळाला धक्का पोहोचवण्यात आला नाही.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय-
भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरबाबत अद्यापतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाहीय. मात्र एक महत्वाची माहिती समोर आली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर नरेंद्र मोदींनी परदेश दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रोएशिया, नॉर्वे आणि नेदरलँड्सचा दौरा सध्यासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताकडून कोणत्या 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक? (India Air Strike On Pakistan)
- बहावलपूर
जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय
आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किमी अंतरावर - मुरीदके
लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय
सीमेपासून 30 किमी अंतरावर - सवाई
लश्कर-ए-तोयबाचा अड्डा
सीमेपासून 30 कि.मी.दूर - गुलपूर
दशतवाद्यांचा अड्डा
ताबारेषेपासून 35 कि.मी. दूर
हल्ल्यावेळी 80 दहशतवादी - बिलाल
जैश-ए-मोहम्मदचं हवाई तळ
सीमेपासून 35 कि.मी.दूर - कोटली
नियंत्रण रेषेपासून 15 किमी अंतरावर
50 दहशतवादी उपस्थित होते. - बरनाला
दहशतवाद्यांचा अड्डा
सीमारेषेपासून 10 कि.मी.दूर - सरजाल
जैश-ए-मोहम्मद चा अड्डा
सीमेपासून 8 कि.मी.दूर - महमूना
हिजबुल्लाचं प्रशिक्षण केंद्र
सीमेपासून 15 कि.मी.दूर
‘ऑपरेशन सिंदूर’ची वैशिष्ट्ये-
- पाकिस्तानच्या रडार यंत्रणेला कळू न देता हल्ला
- भारतानं दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्याची पाकची कबुली
- पाकव्याप्तच नव्हे पाकिस्तानातले अड्डेही उद्धवस्त
- दहशतवादी अड्ड्यांची माहिती अचूक होती हे सिद्ध
- ९ तळांवरील हल्ल्यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा
- भारतीय हवाई हल्ल्यांत एकाही नागरिकाला इजासुद्धा नाही
- आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारताचे हल्ले
राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र-
- पाकिस्तानची 9 लक्ष्य बेचिराख करण्यासाठी राफेल विमानांचा वापर
- राफेल विमानांनी लक्ष्यांवर डागली स्काल्प क्षेपणास्त्र
- अतिदूरच्या लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्काल्प क्षेपणास्त्र
- 500 किमी अंतरावरील लक्ष्यांचा मारा करण्याची स्काल्पची क्षमता
- 1 हजार किमी प्रतितास वेगाने स्काल्प मिसाईल करतं मारा
- शत्रूच्या रडारवर स्काल्प दिसत नसल्याने हल्ला यशस्वी