विदर्भात हवामानात बदलाचे संकेत : हलक्या पावसाची शक्यता

विदर्भासह मध्य भारतात हवामानात लक्षणीय बदल घडण्याची चिन्हे हवामान विभागाने व्यक्त केली आहेत. सध्या मध्य प्रदेशवर हवामानाच्या खालच्या थरात चक्राकार वारे वाहत असून, अरबी समुद्रापासून मध्य प्रदेशपर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे.
त्याचप्रमाणे तेलंगणा क्षेत्रावरही चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहे. राजस्थानपासून झारखंडपर्यंत कमी दाबाचे द्रोणीय क्षेत्र विस्तारले आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवेश लवकरच
१३ मे रोजी नैऋत्य मोसमी वारे अंदमान समुद्रात पोहोचण्यास अनुकूल हवामान असण्याची शक्यता आहे.
तापमानवाढीचा इशारा
पुढील तीन दिवस तापमानात फारसा बदल होणार नाही, परंतु त्यानंतर कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामानाचा अंदाज पुढील प्रमाणे:
📅 आज (७ मे)
अकोला, वाशीम जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा गडगडाट विजांसह पाऊस आणि वेगवान वाऱ्यांची शक्यता
उर्वरित विदर्भातही गडगडाट वावटळी व हलक्या पावसाची शक्यता.
📅 ०८ ते ०९ मे
संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.
📅 १० मे
अमरावती, यवतमाळ आणि पूर्व विदर्भात विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची गडगडाट विजांसह शक्यता.
उर्वरित विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता.
📅 ११ व १२ मे
पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.