AmravatiLatest News
विद्यापीठात डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांची पुण्यतिथी संपन्न
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांची पुण्यतिथी डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन वसतीगृह येथे संपन्न झाली. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, वार्डन डॉ. जागृती बारब्दे तसेच वसतीगृहातील श्री चंद्रशेखर लोखंडे, कर्मचारी, विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते. संचालन व डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.