एम.डी. ड्रग्जसह एक आरोपी अटकेत! नागपूरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी उघड,

नागपूर : कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, काही व्यक्ती अंमली पदार्थाची तस्करी करत आहेत. त्याआधारे पोलीस पथकाने दोन पंचांच्या समक्ष झडती घेतली असता, ०२.३८ ग्रॅम एम.डी (मेफेड्रोन ड्रग्ज) सदृश पावडर मिळून आली. याची किंमत अंदाजे ₹२३,८००/- रुपये इतकी असून, त्याच्यासोबत एक मोबाईल आणि एक दुचाकी मिळून एकूण ₹१,०३,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. झडती ही एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार कायदेशीर पद्धतीने पार पडली असून, आरोपीवर कलम ८(क), २१(ब), NDPS Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग, डीसीपी निकेतन कदम, एसीपी सत्यवीर बंडिवार, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सनीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.