Latest NewsMaharashtra
दहावीचा निकाल या तारखेला लागणार ?

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीचा रिझल्ट कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दहावीचा निकाल हा १५ मेपर्यंत लागू शकतो असं सांगण्यात आले आहे. बारावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसात दहावीचादेखील निकाल जाहीर करु असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच दहावीचा निकाल लागणार आहे.
पुढच्या आठवड्यात १५ तारखेपर्यंत दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाने अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, बारावीच्या निकालानंतर १० दिवसात दहावीचा रिझल्ट जाहीर करु असं सांगितलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात आता उत्सुकता निर्माण झाली आहे.