अकोला : मलाबार गोल्ड अँड डायमंड्स’मधून भरदिवसा अडीच लाखांच सोनं चोरी
अकोला : दुपारी १२.४५ वाजता अकोलाच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागात असलेल्या ‘मलाबार गोल्ड अँड डायमंड्स’ या प्रसिद्ध दागिन्यांच्या दुकानात एक महिला ग्राहक बनून आली. चेहऱ्यावर स्कार्फ, शांत आणि सोज्वळ वावर — पण तिच्या हेतू मागचं वास्तव मात्र धक्कादायक होतं.
फिर्यादी सेल्समन प्रविण वडजे यांना तिने सोन्याची चैन दाखवण्याचा बहाणा केला. ट्रे समोर ठेवल्यावर चतुराईने ०४ ग्रॅम व २० ग्रॅम वजनाच्या दोन चेन पळवल्या. एकूण चोरीची किंमत – ₹२,४८,६२२/- असल्याचं निदर्शनास आलं.
‘एकता ज्वेलर्स’मध्येही प्रयत्न, पण उघड झाली ओळख
याच महिलेनं काही वेळाने ‘एकता ज्वेलर्स’ मध्येही अशाच पद्धतीने चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क कर्मचाऱ्यांनी तिच्याकडून स्कार्फ काढण्यास भाग पाडलं, आणि तिची ओळख उघड झाली.
पोलीस यंत्रणांची तत्परता आणि कारवाई
गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, आणि SDPO सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखा व सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तपास सुरु केला.
पोलीस निरीक्षक शंकर शेळके व जयंत सातव यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण, CCTV फूटेज व गुप्त बातमीदारांच्या आधारे आरोपीची ओळख पटली. ती आहे – इशा सत्यप्रकाश पांडे (वय २२), राहणार कैलास टेकडी, अकोला.
- ₹३.१८ लाखांचा मुद्देमाल जप्त
- तिच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:
- चोरलेल्या दोन सोन्याच्या चेन – ₹२,४८,६२२/-
- TVS Jupiter दुचाकी – ₹७०,०००/-
- एकूण जप्त मुद्देमाल – ₹३,१८,६२२/-