”तुमच्यात दम नाही, मोदींचं नाव घ्यायला घाबरता”; पाकिस्तानच्याच खासदारांचा पंतप्रधान शरीफ यांच्यावर स्ट्राईक

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेर युद्धाला सुरुवात झाली असून गुरुवारी रात्रीपासूनच कराची, इस्लामाबाद आणि लाहोर प्रांतात भारतीय सैन्य दलाकडून पाकिस्तानवर हल्लाबोल करण्यात आला आहे. पाकिस्तानची तब्बल 16 शहरं वायुदलाच्या टार्गेटवर होती. वायूदलाची विमानं, क्षेपणास्त्र, ड्रोन्स यांनी पाकिस्तानला काल रात्री कत्तल की रातची आठवण केली. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये केलेला ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारतानं उधळला. जम्मूच्या सतवारीमध्येही पाकिस्ताननं ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. हा हल्ला देखील भारतानं हाणून पाडला. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरलाहीताब्यात घेण्यात आलं असून त्याची उचलबांगडी केल्याची चर्चा आहे. त्यातच, एकीकडे भारतात सर्वच राजकीय पक्ष आणि संपूर्ण देश सरकारच्या पाठिशी आहे. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना त्यांच्याच खासदारांकडून घरचा अहेर देण्यात येत आहे.
भारताने केलेल्या विविध हल्ल्यात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून फक्त आणि फक्त 20 किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाला. त्यानंतर तातडीनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बंकरमध्ये हलवण्यात आलं. कुरापतखोर पाकिस्तानचे पंतप्रधान घाबरुन बंकरमध्ये लपल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या संसदेतूनही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर शाब्दीक स्ट्राईक केला जात आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरिफ यांना पाकिस्तानी खासदारांनी घरचा आहेर दिला आहे. भारताचे पंतप्रधान मोदींचं नाव घ्यायलाही शरीफ घाबरतात, असं पााकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे खासदार शाहबाज अहमद यांनी म्हटलं आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भूमिकेवर त्यांच्याच देशातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
खासदार उल-रहमान यांचाही हल्लाबोल
पाकिस्तानमधील जमियत उलमा इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार फजल उल-रहमान यांनी देखील संसदेत बोलताना शाहबाज शरीफ यांच्या सरकारविरुद्ध आपला रोष व्यक्त केला होता. देश युद्धाच्या उंबरठ्यावर असून संसदेत कोणीही जबाबदारी व्यक्ती आज संसदेत नाही, म्हणून मी देखील संसदेतून बाहेर पडत आहे, असे फलज उल रहमान यांनी म्हटलं.
भारतीय वायदूलाने शुक्रवारी सकाळी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या ओकारा आर्मी कैंट परिसरात ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. कालच भारताने पाकिस्तानमधील (Pakistan) प्रमुख शहरांवर ड्रोन हल्ले केले होते. त्यानंतर पाकिस्तान सातत्याने सीमारेषेवर हल्ले करत आहे. आज सकाळीच पाकिस्तानचे 5 ड्रोन्स चंदीगढ शहरात शिरले होते. त्यामुळे सायरन वाजवून शहरातील सर्व लोकांना घराबाहेर न निघण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यानंतर आता भारतानेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ला (Drone Attack) केल्याची माहिती समोर आली आहे.