LIVE STREAM

AmravatiLatest News

पश्चिम विदर्भातील तापमान ४३-४५°C पर्यंत, अमरावती जिल्ह्यातही प्रचंड उष्णता

अमरावती : पश्चिम विदर्भातील तापमानाचा पारा ४३ ते ४५ अंश सेल्सिअस पर्यंत पोहचला असून, या भिषण उष्णतेमुळे नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अमरावती जिल्ह्यातील तापमान वाढल्याने सर्वसामान्य नागरिक घरातच राहून ही उष्णता टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. दुपारच्या तापलेल्या वातावरणात घराबाहेर पडणे तर अनेक नागरिकांना परवडत नाही, ज्यामुळे रस्त्यांवरील वर्दळ आणि बाजारपेठांमध्ये कमी होण्याचे चित्र दिसून येत आहे.

हवामान विभागाची ताजी अपडेट – दिलासा देणारा अंदाज
हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, नैऋत्य मान्सून सामान्यपेक्षा एक आठवडा आधी म्हणजेच जून महिन्याच्या सुरुवातीला लवकर दाखल होणार आहे. सामान्यत: मान्सून ७ ते ८ जून रोजी केरळात दाखल होतो, पण यंदा मान्सून जून महिन्याच्या पहिल्या दिवशी दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा दिलासा देणारा अंदाज नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे, ज्यामुळे उष्णतेपासून थोडं दिलासा मिळणार आहे.

१०५% पावसाची शक्यता – जलसाठा आणि भुजल पातळी सुधारेल
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या वर्षी सरासरीच्या १०५ टक्के पावसाची शक्यता आहे, ज्यामुळे जलसाठ्यात वाढ होण्यास मदत होईल. अति तापमानामुळे बाष्पीभवनाने कमी झालेली जलसाठ्याची पातळी वाढल्यास भुजल पातळी सुधारण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यातील जलसाठ्यात घट झाल्याने या वर्षी अनियमित पाणीपुरवठा नियमित होण्यास मदत होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!