सोनसाखळी चोर परतवाडा पोलिसांच्या तावडीत, वयोवृद्ध महिलेला फसवून सोनं केल लंपास

परतवाडा : २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजता, ६४ वर्षीय कीरण कैलास शर्मा ही महिला वाघमाता मंदिरावरून दर्शन घेऊन आपल्या घराकडे परत येत होती. ब्राह्मणसभा कॉलनीतील तिच्या घराजवळ पोहोचल्यावर, गेट उघडताना एक मोटरसायकलवर आलेल्या दोन व्यक्तींनी तिला थांबवून पत्ता विचारण्याचे नाटक केले.
पण त्या संधीचा गैरफायदा घेत, पाठीमागे बसलेल्या एका इसमाने तिच्या गळ्यातील १८.७५ ग्रॅम वजनाचे, अंदाजे १.१७ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि दोघं पल्सर मोटरसायकलवरून फरार झाले.
परतवाडा पोलिसांनी त्वरित गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. गुप्त माहितीच्या आधारे, हे आरोपी भुसावळ येथे असल्याचे कळाले. पोलिसांनी तत्काळ छापा टाकून मजरह अब्बास जाफर ईराणी (१९) या आरोपीला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याने आपल्या साथीदाराचे नाव हसनेन अली जाफर अली ईराणी (२८) सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीसाठी वापरलेली बिना नंबर प्लेट असलेली काळी पल्सर मोटरसायकलही जप्त केली आहे. यावर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये आधीच चोरीचा गुन्हा नोंद आहे.