IPL 2025: आयपीएल अखेर स्थगित, BCCI चा मोठा निर्णय; भारत-पाकिस्तान तणावाचा क्रिकेटवरही परिणाम

सध्या भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव दिसून येतोय. याचा परिणाम क्रिकेटवरही होताना दिसतोय. दरम्यान, देशात आयपीएल पुढे ढकलल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयकडून यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली आहे.
गुरुवारी धर्मशालामध्ये झालेला सामनाही भारत आणि पाकिस्तानमधील युद्धामुळे थांबवण्यात आला होता. आता वाढत्या तणावामुळे आयपीएल स्थगित करण्यात आल्याने चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलं आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शुक्रवारी आयपीएल २०२५ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनेही या विषयावर केंद्र सरकारशी चर्चा केली आणि नंतर हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे
पीटीआयशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिलीये. या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार, “देशात युद्धाची परिस्थिती आहे तरीही देशात क्रिकेट खेळलं जातंय हे योग्य वाटत नाही.” आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकातामध्ये होणार होता. तर दुसरीकडे पाकिस्तान सुपर लीग (PSL) चे उर्वरित सामने UAE मध्ये हलवण्यात आले आहेत.