AmravatiLatest News
अमरावती मधली कंपनीतील कर्मचाऱ्याला पाकिस्तानहून कॉल; ‘बॉम्बनं उडवून टाकू’ अशी धमकी!
अमरावती : अमरावतीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका खासगी कंपनीतील कर्मचाऱ्याला पाकिस्तानमधून व्हॉट्सअॅप कॉल करून ‘बॉम्बनं कंपनी आणि कारखाना उडवून टाकू’ अशी थेट धमकी देण्यात आली आहे.
९२+ कोड असलेल्या पाकिस्तानमधील नंबरवरून तब्बल चार वेळा व्हॉट्सअॅप ऑडिओ कॉल आला होता. या कॉलमधील आवाजात धमकी दिल्याचे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. अचानक मिळालेल्या या धमकीने कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तातडीने ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली.
घटनेची गंभीर दखल घेत नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी तपासात गुंतले आहेत. कॉलचा स्त्रोत, नंबरचे लोकेशन, कॉलचा उद्देश याची चौकशी सुरू असून, सायबर सेललाही सतर्क करण्यात आलं आहे.