बुद्ध पौर्णिमेला जंगलात रात्रभर थरार | १३१ मचाणांवरून मेळघाटात वन्यप्राणी निरीक्षण

अमरावती : यंदा २२ मे रोजी येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेच्या पावन रात्रीसाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात निसर्गप्रेमींसाठी एक अद्वितीय आणि रोमांचकारी अनुभव तयार करण्यात आला आहे. जंगलाच्या नैसर्गिक प्रकाशात वन्यप्राण्यांचे निरीक्षण करण्यासाठी १३१ विशेष मचाणांची व्यवस्था वन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
या उपक्रमात १९७ निसर्गप्रेमी प्रत्यक्ष प्रगणनेत सहभागी होणार असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र मचाणे राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, ४० व्हीआयपी मचाणांची विशेष व्यवस्था करून काही महत्त्वाच्या पाहुण्यांचं स्वागत करण्यात येणार आहे.
गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक सोळंके यांनी City News शी बोलताना सांगितले की,
“यंदाच्या प्रगणनेमध्ये काही आमदार, न्यायाधीश व वरिष्ठ अधिकारीही सहभागी होणार आहेत. याशिवाय यंदा बफर झोनमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांसाठी नवीन विभाग खुला करण्यात आला आहे, जिथे जंगलातील जैवविविधतेचे थेट दर्शन घेता येणार आहे.”
हा उपक्रम केवळ जंगलाचा थरार अनुभवण्यासाठी नाही, तर वन्यजीवन आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि नागरिकांना जंगलाशी भावनिक नातं जपण्याचा एक प्रयत्न आहे.
- घटक वैशिष्ट्ये :
- २२ मे रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त आयोजन
- १३१ निरीक्षण मचाणे
- १९७ निसर्गप्रेमींचा सहभाग
- ४० विशेष व्हीआयपी मचाणे
- नवीन बफर झोनमध्ये जैवविविधतेचे थेट निरीक्षण