महाभारतातून जीवनदृष्टी – स्वामी गोविंददेव गिरी | अमरावतीत महाभारतावर स्वामी गोविंददेव गिरीं यांचे प्रवचन
अमरावती : अमरावतीतील सांस्कृतिक भवन येथे ८ आणि ९ मे रोजी रोटरी क्लबच्या वतीने आयोजित भव्य ‘अमृतवर्षा प्रवचनमाले’ ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या दोन दिवसीय अध्यात्मिक कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे महाभारतविषयक प्रवचन.
स्वामीजींनी आपल्या भाषणातून महाभारत या महान ग्रंथाचे केवळ युद्धकथा म्हणून नव्हे तर मानवतेच्या, धर्माच्या, कर्माच्या आणि जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून सखोल विवेचन केले. विविध पात्रांच्या दृष्टिकोनातून जीवनविवेक, नीती, आणि सदाचार यांचा अभ्यास रसिक श्रोत्यांसमोर त्यांनी मांडला.
हा कार्यक्रम स्वर्गीय श्रीमती शशिकलाबाई मदनलालजी गठ्ठानी यांच्या स्मृतीपित्यर्थ पद्मा किशोर गठ्ठानी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. तर मुख्य संयोजन स्वर्गीय मधुसूदनजी बेनीप्रसादजी जाजोदिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री चंद्रकुमार उर्फ लप्पीशेठ जाजोदिया यांनी केले होते.
दोन दिवस चाललेल्या या प्रवचनमालेत हजारो भाविकांनी उपस्थित राहून अध्यात्मिक ऊर्जा आणि शांततेचा अनुभव घेतला. संपूर्ण सभागृह श्रद्धेच्या आणि भक्तिभावाच्या वातावरणाने भारले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे सदस्य, संयोजक मंडळी आणि सेवाभावी कार्यकर्त्यांचे विशेष योगदान राहिले.