मेळघाट मध्ये आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते शववाहिकेचे लोकार्पण

मेळघाट : मेळघाट मध्ये मृत्यू झाल्यानंतर शव नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे मग त्यासाठी वर्गणीच्या सहाय्याने असो किंवा मग रुग्ण वाहिकेच्या मदतीने शव घेऊन जावे लागत असे मागील महिन्यात आरोग्य मंत्र्यांनी मेळघाट दौरा केला असता त्यांना शववाहिकेची मागणी केली आणि आज मेळघाट मध्ये चार शववाहिनी मंजूर करण्यात आली त्यामध्ये धारणी,साद्राबाडी,चुरनी,टेंभ्रूसोंडा येथील रुग्णालयात देण्यात आल्या.आज धारणी येथे २ शववाहिनीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी धारणी प्रकल्प अधिकारी प्रियवंदा म्हादळकर,गटविकास अधिकारी विजय गायकवाड,तालुका वैद्यकीय अधिकारी वानखडे मॅडम, वैद्यकीय अधिकारी साबळे मॅडम ,धारणी शहराध्यक्ष विवेक नवलाखे ,तालुकाध्यक्ष गजानन सुळसकर ,राजा पाटील,शैलेश म्हाला,डॉ.जामकर,आकाश खैरकर,राहुल सोनोने,पदाधिकारी,नागरिक उपस्थित होते.