Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ; वाचा आजचे दर

सध्या भारत पाकिस्तान युद्ध सुरु आहे. युद्धाचा परिणाम हा सोने चांदीच्या भावावरदेखील होताना दिसत आहे. सोन्याचे भाव सतत कमी जास्त होत आहेत. सोन्याचे भाव आज वाढले आहे. काल सोन्याच्या भावात काही बदल झालेला नव्हता. आज सोन्याचे भाव प्रति तोळा ३३० रुपयांनी वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र, सध्या सोन्याचे भाव सतत वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ वळवल्याचे दिसत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे भाव
आजचे सोन्याचे भाव
आज सोन्याच्या भावात ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ९८,६८० रुपये आहे. प्रति तोळा ३३० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७८,९४४ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ९०,४५० रुपये आहे. या किंमतीत ३०० रुपयांनी वाढ झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत ७२,३६० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ७४,०१० रुपये आहे. या गरात २५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर ८ कॅरट सोन्याच्या किंमतीत २०० रुपयांनी वाढ झाली आहे.
सोन्याच्या भावात सतत बदल
सोन्याचे भाव गेल्या अनेका दिवसांपासून बदल आहेत. सोन्याचे भाव सत्त बदलत असल्याने ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव १ लाखांच्या पार गेले होते. हे भाव रोज बदलत आहेत. लवकरच हे भाव आणखी वाढतील असं सांगण्यात येत आहे.