Maharashtra Weather: अवकाळीचे सावट कायम! पुढचे ५ दिवस महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार

गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. राज्यावर अवकाळीचे सावट कायम आहे. पुन्हा राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पाऊस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला अवकाळी पाऊस झोडपून काढणार आहे. याठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वादळी पावसाचे वातावरण कायम आहे. गेल्या ३ दिवसांपासून काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे उन्हाचा चटकाही कमी झालेला दिसत आहे. हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. ३ दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील काही उन्हाळी पिकांसह फळपिकांचे नुकसान झाले आहे. पुढील ४ दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातही पुढील ४ दिवस काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही पावसाला पोषक हवामान आहे.