Latest NewsOperation Sindoor
Shrinagar: श्रीनगरमध्ये ३ मोठे स्फोट, विमानतळ परिसरात संशयास्पद ड्रोन, नागरीक भयभीत

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. श्रीनगर परिसरात सलग तीन मोठे स्फोट झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर, श्रीनगर विमानतळ परिसरात संशयास्पद ड्रोन दिसले आहे. ड्रोनविरोधी क्षेपणास्त्रांचा संशयास्पद ड्रोनवर मारा करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर विमानतळ परिसरातील वीज घालवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली असून, संशयास्पद ड्रोन दिसल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.