AkolaLatest News
अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘तिरंगा रॅली’; भारतीय सैन्याला अभिवादन

अकोला – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यंदा आपल्या वाढदिवसानिमित्त कोणताही गाजावाजा न करण्याचा निर्णय घेतला. पहेलगाव येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशात निर्माण झालेल्या युद्धसदृश्य वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी भारतीय सैन्याच्या मनोबल वृद्धीसाठी स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाचे स्वागत करत, अकोला शहरात आज ‘तिरंगा रॅली’ काढण्यात आली. शहराच्या मुख्य रस्त्यांवरून निघालेल्या या रॅलीमध्ये नागरिकांनी, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
रॅली दरम्यान “भारतीय सैन्याचा विजय असो”, “जय भारत”, “भारत जिंदाबाद!” अशा देशभक्तीपूर्ण घोषणा दिल्या गेल्या. तिरंगा हातात घेऊन शहरभर निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण वातावरण देशप्रेमाने भारावले.