ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

भोपाल : मध्य प्रदेशच्या भोपालमध्ये काल ताप्ती बेसीन मेगा रीचार्ज प्रकल्पासाठी एक विशेष बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव उपस्थित होते. या बैठकीत ताप्ती बेसीन मेगा रीचार्ज प्रकल्पासाठी MOU (Memorandum of Understanding) साइन करण्यात आले.
धारणी तालुक्यातील तापी नदीच्या पात्रात स्थित खार्या घुटीघाट गावा नजीक लवकरच या प्रकल्पाची कामे सुरू होणार आहेत. प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये पाण्याचा समान वितरण होईल आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल. यानुसार, मध्य प्रदेशातील 31.13 टी.एम.सी. पाणी आणि महाराष्ट्रातील 19.36 टी.एम.सी. पाणी या प्रकल्पातून उपलब्ध होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि डॉ. मोहन यादव यांनी या प्रकल्पाला “विश्वातील सर्वात मोठा ग्राऊंड रीचार्ज प्रकल्प” म्हणून ओळखले आणि याबद्दल अधिक माहिती दिली. प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातील 1,23,082 हेक्टर शेतजमिनीला सिंचन मिळेल, तसेच महाराष्ट्रातील 2,34,706 सेक्टर शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी मिळेल.
या प्रकल्पाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे कोणत्याही गावांना पुनर्वसनाची आवश्यकता न होईल, असे स्पष्ट करण्यात आले. यासाठी प्रकल्पाच्या सर्व अडचणी जवळपास पूर्ण झाल्या असून, आता कामे त्वरित सुरू होणार आहेत.
मध्य प्रदेशाचे जल संसाधन मंत्री विजय शाह, महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, तुलसी सीलावर, जी.भा. ज.प. चे शर्मा जी, आणि अर्चना ताई चिटननीस यांसारखे मान्यवरही यावेळी उपस्थित होते.