LIVE STREAM

Accident NewsLatest NewsSatara

देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, मिनी ट्रॅव्हल्स- ट्रकची जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू, 8 जखमी

सातारा : सातारा जिल्ह्यातील लोणंद-सातारा मुख्य रस्त्यावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. सालपे गावाजवळ मिनी ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत. उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या इचलकरंजी येथील भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या अपघातात ट्रॅव्हल्स चालक आणि एक महिला जागीच ठार झाले तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली तिचा सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. यामध्ये मृत ट्रॅव्हल्स चालक सलमान इम्तियाज सय्यद (वय 24), आणि रजनी संजय दुर्गुळे वय 48 रा.पेठ वडगाव तालुका हातकलंगले अशी नावे आहेत. पुढील तपास सुरु आहे..

नक्की घडले काय?
सातारा-लोणंद मार्गावर रविवारी मध्यरात्री भीषण अपघात घडला असून, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून समजली माहिती अशी, इचलकरंजी येथील ट्रॅव्हल्स बस क्रमांक (एम एच 04 सीपी 2452) ही भाविक महिलांना घेऊन उज्जैन येथे देवदर्शनास निघाली होती. ही बस वाठार स्टेशन मार्गे सालपे चा घाट उतरून लोणंद दिशेकडे शनिवारी मध्यरात्री जात होती. याच दरम्यान लोणंद बाजूकडून साताऱ्याकडे जाणारा ट्रक क्रमांक (एम एच 42 बीएफ 77 84) हा ट्रक सालपे गावाजवळील एका वळणावर समोर आल्यानंतर दोन्ही वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेनंतर सालपे ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन भाविकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या विषयात टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट धाव घेऊन जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले .याबाबतची नोंद करण्याचे काम लोणंद पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते .पुढील तपास सातारा पोलिस सुशील भोसले करीत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!