मुर्तिजापूर पोलिसांची मोठी कारवाई! माना गावातील 40 गोवंश जनावरांची सुटका

अकोला – अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माना गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ईदगाह प्लॉट परिसरात तब्बल 40 गोवंश जातीच्या जनावरांना कत्तल करण्याच्या उद्देशाने अमानुषपणे बांधून ठेवण्यात आले होते, अशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ धाड टाकत मोठी कारवाई केली आहे.
माना पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्व 40 गोवंश जनावरांची सुखरूप सुटका केली. मात्र या प्रकरणातील मुख्य आरोपी अल्ताफ अहमद मुमताज अहमद हा घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला आहे.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध गोवंश संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांची विशेष पथके आरोपीच्या मागावर आहेत.
दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या गोवंश जनावरांची पुढील देखभाल आणि संरक्षणासाठी त्यांना संत पुंडलिक बाबा गोरक्षण, मूर्तिजापूर येथे हलवण्यात आले आहे.