Hingoli Police : दोन वर्षात एकही गुन्हा दाखल नाही; पोलिसांच्या रजिस्टरमधून गुन्हेगारांची नावे कमी

हिंगोली : साधारण दहा वर्षांपूर्वी गुन्हेगारी माजविणाऱ्यांची नावे पोलिसांनी गुंडा रजिस्टर मधून कमी करण्यात आली आहे. पोलिसांनी जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेचे हे फलित आहे. यामुळे अनेक गुन्हेगारांना दिलासा मिळाल्याचे चित्र हिंगोली जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. मागील दोन वर्षात एकही गुन्हा दाखल झाला नसल्याचे रेकॉर्ड मधून उघड झाल्याने पोलिसांनी नावे कमी केली आहेत.
हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या रेकॉर्डवर असलेल्या अनेक गुन्हेगारांची नावे गुंडा रजिस्टर मधून पोलीस दलाने कमी केली आहेत. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्हाभरात गुन्हेगारी सोडून समाज सेवेकडे वळलेल्या लोकांना पोलिसांचा नाहक त्रास होऊ नये; यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेला चांगला फायदा झाल्याचे दिसून येत आहे.
गुन्हा दाखल न झालेल्यांची नवे कमी
पोलिसांनी राबविलेल्या या मोहिमेत न्यायालयाने निर्दोष ठरवलेल्या आणि मागील दोन वर्षाच्या कार्यकाळात एकही गुन्हा दाखल न झालेल्या गुन्हेगारांची नावे पोलिसांच्या गुंडा रजिस्टर मधून कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील ठाणेदारांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगारांची माहिती घेऊन ही नावे कमी करत गुन्हेगारी कमी केलेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे.