“अमरावती जिल्हा रुग्णालयात बुद्ध पौर्णिमा व जागतिक परिचारिका दिन साजरा
अमरावती : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे बुद्ध पौर्णिमा तसेच जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालयाच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बुद्ध मूर्तीची पूजा करुन शांती आणि समतेचा संदेश दिला गेला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात फ्लॉरेन्स नाइटिंगले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. परिचारिका दिनानिमित्त रुग्णालयाच्या परिचारिका व कर्मचाऱ्यांचा सन्मान करत, त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमात ललिता अटाळकर, कधिसेविका, जिल्हा सामान्य रुग्णालय यांनी भाग घेतला आणि आपल्या भाषणात, रुग्णसेवा क्षेत्रातील महत्वाची भूमिका बजावणार्या परिचारिकांचा सन्मान करण्याचे महत्त्व सांगितले.
“बुद्धांच्या विचारांप्रमाणे, सेवा ही मानवतेची खरी ओळख आहे. आजच्या दिवशी, आपण आपल्या समाजातील प्रत्येक रुग्णाच्या आरोग्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व परिचारिकांना आभार मानतो,” असे ललिता अटाळकर यांनी आपल्या बाईटमध्ये सांगितले.