आज पुन्हा सोनं झालं स्वस्त, लग्नाचे दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी; वाचा 24 कॅरेटचे भाव

Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचे भाव लाखांच्या पार गेले होते. मात्र आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दरांमध्ये दबाव असून यामुळं गुंतवणुकदारांना मोठा झटका बसला आहे. MCXवर सोनं जवळपास हजार रुपयांनी घसरलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं जवळपास 60$ ने घसरून $3,240 वर पोहोचलं आहे. यात 2 टक्क्यांची घसरण झाली आहे.
सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीचे एकमेव कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडी. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाचाही परिणाम सोन्याच्या दरांवर होताना दिसतोय. ट्रेड टेन्शन कमी होताच गुंतवणुकदार इक्विटीसारख्या अॅसेट्समध्ये गुंतवणुक करत आहेत. त्याव्यतिरिक्त रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धविरामाच्या अपेक्षा आणि भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी यामुळंही बाजारात स्थिरता आहे. अशातच सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढली आहे.
चांदीच्या किंमतीतही आज काहीशी घसरण होताना दिसत आहे. देशांतर्गंत बाजारात चांदीच्या किंमतीत 0.5 टक्क्यांची घसरण होताना दिसत आहे. MCX वर जवळपास 96,000 प्रति किलोग्रॅमच्या आसपास ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजेच कॉमेक्सवर चांदीच्या दरात मजबूती आली असली तरी $33 प्रति औंसवर पोहोचली आहे. तर, मागील एका आठवड्यात चांदी 3 टक्क्यांनी जास्त वाढली आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1800 रुपयांची घसरण झाली असून प्रति तोळा 96,880 रुपयांवर पोहोचले आहे. 22 कॅरेट 1,650 रुपयांनी घसरून 88,800 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोनं 1,350 रुपयांनी घसरून 72,660 रुपयांवर पोहोचले आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 88,800 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 96,880 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 72,660 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,880 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 9,688 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,266 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 71,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 77,504 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 72,660 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 88,800 रुपये
24 कॅरेट- 96,880 रुपये
18 कॅरेट- 72,660 रुपये