Maharashtra SSC 10th Result: उद्या लागणार दहावीचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (MSBSHSE) घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) निकालाची तारीख बोर्डाने जाहीर केली आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून पुढील दोन आठवड्यामध्ये निकाल जाहीर होणार असं सांगितलं जात होतं. मात्र त्यापूर्वीच आज विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का देताना 13 मे 2025 रोजी निकाल जाहीर होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील पत्रकच बोर्डाने जारी केलं आहे.
कधी आणि किती वाजता लागणार निकाल?
बोर्डाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रकामध्ये, “फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेच्या निकालाबाबत” अशा मथळ्याखाली सविस्तर माहिती देण्यात आली आहे. “महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दिनांक 13 मे, 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे,” अशी घोषणा पत्रातून बोर्डाने केली आहे.
तसेच “यासंदर्भात पत्रकार परिषद मंगळवार, दिनांक 13 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता राज्य मंडळ कार्यालयात आयोजित केलेली आहे,” असंही सांगण्यात आलं आहे.
कुठे पाहाल निकाल?
महाराष्ट्र बोर्डाचा 10 वी चा (SSC) निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाइट्स वापरू शकता:
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in.
11 वीचा प्रवेश ऑनलाइनच होणार
दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी या कॉलेज ते कॉलेजच्या पायऱ्या चढावा लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची ही गैरसोय आणि धावपळ टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डाने महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र बोर्डाने यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे. अकरावी प्रवेशासाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ Mahafyjcadmissions.in याचा वापर पालक आणि विद्यार्थ्यांनी करावा असं आवाहन महाराष्ट्र बोर्डाने केला आहे.