LIVE STREAM

Latest NewsPune

तथागत गौतम बुद्धांचे विचार देशाच्या आत्मनिर्भरतेचा खरा मार्ग

पुणे : बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या देशाच्या आयरन लेडी सुश्री बहन मायावती जी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त भारतासह संपूर्ण जगात गौतम बुद्धांचे विचार पोहोचवून भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या प्रयत्नाचे स्मरण करून दिले.तथागत गौतम बुद्धांना शतशः नमन करीत सुश्री बहन जी यांनी शांततेने, द्वेषमुक्त, समृद्ध जीवन जगण्याच्या शुभेच्छा देशवासियांना दिल्या.

बहन जी यांनी त्यांच्या संदेशात गौतम बुद्धांच्या “अत्त दीप भव” या शिकवणीचा विशेष उल्लेख केला. स्वतः शिक्षित व्हा, स्वतः उभे राहा आणि स्वतःचा प्रकाश बना– हा संदेश आजच्या काळात सर्वाधिक उपयुक्त आहे.भारतीय संविधानात अंतर्भूत असलेला हा विचारच देशाच्या आत्मनिर्भरतेचा आणि आत्ममूल्यांच्या विकासाचा पाया ठरू शकतो, असे प्रतिपादन मायावती जी यांनी केल्या, अशी माहिती पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी मंगळवारी (ता.१३) दिली.

बसपने उत्तर प्रदेशात सत्ता असताना केवळ घोषणांची नाही, तर प्रत्यक्ष कृतीची संस्कृती निर्माण केली. बसप सरकारने ‘कायद्याने कायद्याचे राज्य’ प्रस्थापित करून ‘सबका न्याय’ हे संविधानिक तत्व आत्मसात केले. इतर पक्ष केवळ राजकीय फायद्यासाठी संत-महापुरुषांचे नाव घेतात, परंतु बसपने त्यांच्या विचारांवर चालून जनतेच्या जीवनात परिवर्तन घडवले, असा विश्वास सुश्री बहन मायावती जीं यांनी व्यक्त केल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

गौतम बुद्धांच्या विचारसरणीवर आधारित असंख्य योजना आणि स्मारके बसप सरकारच्या कार्यकाळात उभारण्यात आली. ५११ एकर क्षेत्रात उभारलेले ‘गौतम बुद्ध विद्यापीठ’, राजधानी लखनऊमधील ‘बौद्ध विहार शांतिउपवन’, तसेच ‘मान्यवर कांशीराम स्मारक’ परिसराचा विकास, ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. यासोबतच ‘बौद्ध परिपथ’चा विकास, कपिलवस्तु येथे हवाई पट्टी व पर्यटक निवास गृह, तसेच श्रावस्ती, महामाया नगर, कौशांबी आणि कुशीनगरसारख्या जिल्ह्यांची स्थापना करण्यात आली, असे बहनजी यांनी स्पष्ट केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित ‘ग्रामसभा समग्र विकास योजना’च्या माध्यमातून बसप सरकारने ग्रामीण भारतातील उपेक्षित, वंचित वर्गासाठी रस्ते, वीज, पाणी, शौचालये, आरोग्य केंद्रे यांसारख्या १८ मूलभूत सुविधा प्रभावीपणे पुरविल्या.

केवळ मोठमोठ्या व्याख्यानांनी किंवा पवित्र स्थळांवर नतमस्तक होऊन जनतेला न्याय मिळणार नाही, असे बहनजी यांनी स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांवर चालण्याचा खरा अर्थ म्हणजे – द्वेष, जातीयता व हिंसेपासून मुक्त होऊन एका समतावादी समाजाची स्थापना करणे. देशाला खऱ्या अर्थाने विश्वगुरू बनवण्यासाठी हेच खरे अभिवादन ठरेल, असे डॉ.चलवादी म्हणाले.

बसप या विचारांसाठी केवळ राजकीय पक्ष न राहता, एक सामाजिक परिवर्तनाचे मिशन आहे, जे अखंडपणे कार्यरत आहे.आपल्या कृतीतून बुद्धांचे आदर्श जगवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन यनिमित्त सुश्री बहन मायावती जी यांनी देशातील सर्व सरकारांना आणि नागरिकांना केल्याची माहिती डॉ.चलवादी यांनी दिली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!