Kolhapur: अंबाबाई अन् जोतिबा मंदिरात शॉर्ट ड्रेसला मनाई, पश्चिम देवस्थान समितीचा निर्णय

कोल्हापुरातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोल्हापुरातील श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करावेत, तसेच तोकडे कपडे परिधान करू नये, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केला आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत भाविकांना नम्र आवाहन केले आहे की, “धार्मिक विधी आणि मंदिरातील पवित्रतेचा विचार करता, तोकडे कपडे न घालता पारंपरिक पोशाखात मंदिरात प्रवेश करावा.” असे आवाहान त्यांनी केले आहे.
अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. त्यामुळे या मंदिराच्या धार्मिक महत्त्वाला अनुसरून भक्त भाविकांनी पोशाख निवडावा, असे देवस्थान समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे आवाहन महिलांना, पुरूषांना आणि पर्यटकांनाही लागू करण्यात आला आहे.