अमरावती मनपाच्या शाळा क्र. १३ च्या ३ विद्यार्थ्यांनी १० वी परीक्षेत गाठले यश

अमरावती : अमरावती महानगरपालिकेच्या शाळांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, दर्जेदार शिक्षणासाठी भव्य इमारती नव्हे तर जिद्द, समर्पण आणि शिक्षणावरील विश्वास आवश्यक आहे. चपराशी पुरा येथील मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक १३ मधील तीन विद्यार्थ्यांनी १० वीच्या परीक्षेत यश मिळवून संपूर्ण शाळेचा गौरव वाढवला आहे.
गेल्याच वर्षी सुरू झाला होता दहावीचा वर्ग:
गेल्या वर्षीच शाळा क्र. १३ मध्ये दहावीचा वर्ग सुरू करण्यात आला होता.
मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण शिक्षकवृंदाने शाळेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विशेष प्रयत्न केले.प्रत्येक वर्गाला महापुरुषांचे आणि विविध क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे नाव देण्यात आले.
सीसीटीव्ही कॅमेरे, रंगरंगोटी, आधुनिक सुविधा यामुळे शाळेचे स्वरूप खाजगी शाळांसारखेच करण्यात आले.
विद्यार्थ्यांचे संघर्ष आणि यश:
अस्मिता रंजीत इंगळे –
८०% गुण मिळवत शाळेत पहिली
वडिलांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने
आई घरकाम करून करते उदरनिर्वाह
अस्मिताने परिस्थितीवर मात करत मिळवले हे यश
तन्वी शरद उके –
७०% गुण
वडील मजूर
कोणतीही खासगी शिकवणी न लावता जिद्दीने दिली परीक्षा
सुप्रिया राम वाकोडे –
६५% गुण
आई-वडील दोघेही मजुरीवर
कष्टातून शिकत मिळवले समाधानकारक यश
१७ विद्यार्थ्यांनी दिली दहावी आणि सर्वजण उत्तीर्ण:
या वर्षी एकूण १७ विद्यार्थ्यांनी १० वी ची परीक्षा दिली आणि सर्वजण झाले उत्तीर्ण.
विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचा मोलाचा वाटा असून शिक्षिका वैषाली विहिरे, क्लर्क ऋषभ आठवले यांनी विद्यार्थ्यांना पेढे आणि पुष्पगुच्छ देत कौतुक केले.
प्रशासनाचे मार्गदर्शन आणि समर्थन:
मनपा आयुक्त सचिन कलंत्रे आणि शिक्षणाधिकारी प्रकाश मेश्राम यांनी वेळोवेळी शाळेला मार्गदर्शन आणि पाठबळ दिले.
यामुळेच शाळा क्र. १३ आज मनपा शाळांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.