न्यायमूर्ती #भूषण_गवई देशाचे नवे सरन्यायाधीश, दारापूर गावात मिठाई-फटाक्यांसह जल्लोष
दारापूर : भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अभिमानास्पद क्षण… अमरावती जिल्ह्यातील सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाचे ५०वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून नियुक्ती झाल्याने संपूर्ण दारापूर गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यायमूर्ती गवई यांचे मूळ गाव असलेल्या दारापूरमध्ये त्यांच्या या यशाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. गावकऱ्यांनी एकमेकांना मिठाई वाटत फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. अनेकांनी रांगोळ्या काढून, बॅनर लावून आणि पारंपरिक पद्धतीने अभिनंदनाचे फलक उभारून आपला आनंद व्यक्त केला.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, “भूषण गवई हे आमच्या गावाचा अभिमान आहेत. सामान्य कुटुंबातून उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च पदापर्यंत त्यांची वाटचाल प्रेरणादायी आहे.”
यावेळी गावातील विविध सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वत्र “दारापूरचा सुपुत्र सर्वोच्च न्यायालयात” अशी गूंज ऐकू येत होती.
न्यायमूर्ती गवई यांचे अभिनंदन करताना गावकऱ्यांनी त्यांच्याकडून न्याय, पारदर्शकता आणि संविधानाच्या मूल्यांची नितांत नीट जपणूक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.