परतवाडा आणि अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची बाजार समितीत गर्दी – गव्हाच्या दरात 200 ते 300 रुपयांची घट
परतवाडा आणि अचलपूर : गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची मोठ्या प्रमाणात आवक नोंदवली गेली असून, मागील गुरुवारी तुलनेत यावेळेस गव्हाच्या दरात 200 ते 300 रुपयांची घसरण झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी गहू साठवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
परतवाडा व अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 2 ते 3 प्रमाणे पोती खरेदी करत बाजार समितीमध्ये गव्हाची मागणी वाढवली. त्यामुळे गव्हाचे दर हे 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटल या दरम्यान राहिले.
पारदर्शक कामकाज – शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणारे निर्णय
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी सभापती प्रतिभा प्रशांत ठाकरे यांच्या नेतृत्वात सुधारणा राबवण्यात येत आहेत. सकाळी ८ वाजल्यापासून कृषी मालाचे मोजमाप सुरू होते आणि रात्री अगोदरच शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्यात येते, यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास अधिक बळावला आहे.
संचालक मंडळाचा ठाम पाठिंबा
बाजार समितीच्या सर्व संचालकांनी प्रतिभाताई ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत त्यांच्या निर्णयांचे स्वागत केले आहे. शेतकरी वर्गासाठी सुविधा, वेळेत व्यवहार आणि दर पारदर्शकतेने जाहीर होणे यामुळे समितीचा कार्यप्रणालीत सकारात्मक बदल दिसून येत आहे.