रुग्ण येतात बरे होण्यास मात्र घाणीने बर होईल का सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये दृश्य
अमरावती : रुग्ण येतात बरे होण्यासाठी… मात्र इथे पाहिले की ओकाऱ्याचं येईल!
अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये एकीकडे अत्याधुनिक उपकरणं, यशस्वी ऑपरेशन्स करणारे तज्ज्ञ डॉक्टर, तर दुसरीकडे घाणीच्या साम्राज्याने वेढलेलं हॉस्पिटलचं वास्तव समोर आलं आहे.
सिटी न्यूजकडे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी तक्रार केली होती की, आयसीयू परिसरात व आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छतेचे भयावह चित्र दिसते. त्यामुळे 15 मे रोजी आमच्या प्रतिनिधींनी थेट रुग्णालय गाठले, आणि वास्तव पाहून चकित व्हायला झालं.
- काय दिसले दृश्य?
टप्पा क्र. 1 च्या इमारतीच्या बाजूला ओव्हरफ्लो कंटेनर, कचऱ्याचा ढिगारा आजूबाजूला पसरलेला. - बाजूलाच जणू एखादं डम्पिंग यार्ड! रुग्णालय परिसरातच कचऱ्याची साठवणूक.
- वाहन पार्किंगच्या जागेतही कचरा आणि दुर्गंधी.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर जुन्या बांधकाम साहित्याचे ढिगारे.
रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, पण स्वच्छता कोलमडली!
या हॉस्पिटलमध्ये यापूर्वी विविध प्रकारच्या जटिल आजारांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया झाल्या आहेत, हे सुद्धा सिटी न्यूजने वेळोवेळी दाखवले. मात्र, सध्या स्वच्छतेचा अभाव ही मोठी समस्या ठरतेय.
जवाबदार कोण?
ही परिस्थिती पाहता प्रश्न उपस्थित होतो –
स्वच्छता कंत्राटदार अपयशी ठरत आहेत की रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करतंय?
आयसीयूसारख्या संवेदनशील विभागाजवळील घाणीचे प्रमाण केवळ अस्वस्थ करणारे नाही, तर धोकादायक देखील ठरू शकते.
नागरिकांचा सवाल
रुग्णांच्या नातेवाईकांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितलं –
“इथे उपचारांसाठी येतोय, पण आजूबाजूची घाण पाहून मानसिक त्रास होतो. रुग्णालय म्हणजे पवित्र ठिकाण… हे दृश्य पाहून मन विषण्ण होतं.”