धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
धारणी : आज धारणी तालुक्यातील कुसुमकोट बुजुर्ग गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. धारणी येथील शासकीय ब्लड बँक व रक्त घटक विलगीकरण केंद्र, उपजिल्हा रुग्णालय धारणी, ग्राम पंचायत कुसुमकोट बुजुर्ग आणि आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.
या उपक्रमात शेकडो ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रक्तदान केले.
गावकऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या शिबिराने सामाजिक एकतेचं उत्तम उदाहरण घालून दिलं.
उपस्थित मान्यवर आणि अधिकारी:
या रक्तदान शिबिरावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये –
ग्रामपंचायत सरपंच प्रेमलता सतीश भिलावेकर,
- ग्रामसेवक संदीप पटोरकर,
- डॉ. प्रियांका काळे,
- ग्रामपंचायत सदस्य,
- आशा वर्कर्स,
- एमपीडब्ल्यू डॉक्टर,
ब्लड बँक टीमचे आकाश वाघमारे, अविनाश यादव, प्रियांका परदेशी, अतुल खंडारे,
तसेच पुसून कोड बुजुर्ग येथील डॉक्टर प्रियांका काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:
शिबिरात महिला व युवक-युवतींचा विशेष सहभाग दिसून आला.
आरोग्य यंत्रणांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित रक्तदान, जनजागृती, आणि आरोग्य तपासणी यासारख्या विविध बाबींचा समावेश होता.
आयोजकांचे मत:
“या शिबिरामध्ये मिळालेल्या प्रतिसादामुळे ग्रामीण भागात आरोग्याविषयी जनजागृती वाढते आहे, हा एक सकारात्मक संकेत आहे,” असे शिबिरातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने सांगितले.
उद्दिष्ट आणि पुढील उपक्रम:
ब्लड बँकच्या माध्यमातून जमा झालेले रक्त धारणी उपजिल्हा रुग्णालयामार्फत आपत्कालीन गरजूंना दिले जाणार आहे.
यासारखी आरोग्य शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.