नागपूरमध्ये व्यापाऱ्याच्या चेकबुकची चोरी; बनावट सही करून वटवण्याचा कट उघड
नागपूर : शहरातील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या कार्यालयातून चेकबुक चोरी करून त्यावर खोट्या सह्या करत बँकेत रक्कम वटवण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
ही धक्कादायक घटना अक्षय लिंबना या उद्योजकाच्या कार्यालयाशी संबंधित असून, याप्रकरणी पोलिसांनी सत्तार कुतुबुद्दीन अंसारी (वय 42, रा. भांडेप्लॉट, उमरेड रोड) याला अटक केली आहे. तपासादरम्यान त्याच्या कटात सहभागी असलेला दुसरा आरोपी पंकज राहंगडाले (वय 30, रा. जगदीश नगर, काटोल रोड) याचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
कामाचे पैसे न मिळाल्याने रचला कट
तपासात उघड झाले की, अंसारीने अक्षय लिंबनाच्या हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम केले होते. मात्र त्याचे संपूर्ण पैसे न मिळाल्याने, त्याने पंकज राहंगडाले याच्यासोबत संगनमत करून चेक चोरी व फसवणुकीचा कट रचला.
दोघांनी बनावट रबरी स्टॅम्प, खोटे दस्तावेज तयार करून लिंबनाच्या कार्यालयातून चेकबुक चोरी केली आणि त्यावर खोटी सही करून चेक वटवण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेने वेळेत याची शंका घेत पोलिसांकडे तक्रार दिली.
कायदेशीर कारवाई – गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी अंसारी व राहंगडाले यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 318(4), 61(2), 229(2), 336(3), 340(2), 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कलमे चेक फसवणूक, बनावट दस्तऐवज निर्मिती, आणि विश्वासघात यांच्याशी संबंधित असून, गंभीर स्वरूपाची आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई
या गुन्ह्याचा तपास पोलीस उप आयुक्त राहुल मदने, सहायक पोलीस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सुरू असून, पुढील पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली: