शिक्षेकेची ऑनलाईन फसवणूक लग्नाचं अमिश देत केला विश्वासघात
अकोला : डिजिटल युगात विवाहासाठी नात्यांची जुळवाजुळव ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र, अशाच एका प्लॅटफॉर्मवरून शिक्षिकेला फसवून तिच्या आयुष्याशी आणि आत्मसन्मानाशी खेळ खेळल्याची धक्कादायक घटना अकोल्याच्या मुर्तीजापूरमध्ये समोर आली आहे.
29 वर्षीय पीडित शिक्षिका आणि आरोपी स्वप्नील भिसे यांच्यात ओळख वाढली होती. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर 28 एप्रिल रोजी जालना येथील घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, नंतर लग्नास नकार देत तिला फसवले.
या विश्वासघातामुळे पीडित शिक्षिकेच्या केवळ वैयक्तिक आयुष्यालाच नव्हे, तर तिच्या सामाजिक प्रतिष्ठेला आणि आत्मविश्वासालाही जबरदस्त धक्का बसला आहे.
या प्रकरणी पीडित शिक्षिकेने मुर्तीजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरोधात फसवणूक आणि विश्वासघाताच्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, आरोपीच्या अटकेसाठी हालचाली सुरू आहेत.