LIVE STREAM

Crime NewsLatest News

दृश्यम’ स्टाईल खून! प्रियकराने केला प्रेयसीच्या भावाचा खून

तुम्ही ‘दृश्यम’ चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटात एक गुन्हा होऊनही तो सिद्ध होत नाही. नियोजन करुन मृतदेहाची विल्हेवाट लावल्यामुळे हा गुन्हा सिद्धच होत नाही. असं या चित्रपटात दाखवले आहे. आता मध्य प्रदेशात अशाच पद्धतीचा गुन्हा केल्याचे समोर आले आहे. पण, हा गुन्हा मीठामुळे उघडकीस आला.

इंदूरजवळील खुदाईल पोलीस स्टेशन परिसरात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या भावाची हत्या केली आणि मृतदेह तलावाच्या काठावरील खड्ड्यात पुरला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्याला वाटले की मृतदेहातून दुर्गंधी येत असेल. असा विचार करून, त्याने मृतदेह मिठात पुरण्यासाठी काही कामगारांना सोबत घेतले, पण दारूच्या नशेत त्या कामगारांनी घटनेची माहिती उघड केली. नंतर या खळबळजनक हत्येचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी एका तरुणीने तिचा २१ वर्षीय भाऊ विशाल याची खुडाईल पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलीस त्या तरुणाचा शोध घेत होते. दरम्यान, काही गावकऱ्यांनी मुलीच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितले. सेमलियाचौजवळ एका अज्ञात मृतदेहाची माहिती मिळाल्यावर पोलिसही या दृष्टिकोनातून तपास करत होते. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला होता तेव्हा काही खबऱ्यांनी पोलिसांना सांगितले की काही मद्यपी एका व्यक्तीचा मृतदेह मिठात पुरण्यासाठी पैसे मिळवण्याबद्दल बोलत आहेत. यावर पोलिसांनी आधी व्यसनींना पोलिस ठाण्यात आणले आणि त्यांची चौकशी केली, त्यानंतर अज्ञात मृतदेह आणि बेपत्ता तरुणाची ओळख सारखीच असल्याचे समोर आले.

विशालची बहीण यांच्यात ५ वर्षांपासून प्रेमसंबंध

परिसरात राहणारा आरोपी रोहित परमार आणि मृत विशालची बहीण यांच्यात ५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणीच्या भावाला त्यांच्या प्रेमसंबंधाचे समजले तेव्हा त्याने रोहितला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. रोहित गावात एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम करायचा. मृत विशाल आणि त्याची बहीण कपड्यांच्या दुकानात काम करायचे. जेव्हा विशालने रोहितला ब्लॅकमेल करणे थांबवले नाही, तेव्हा तो संतापला आणि त्याने विशालला संपवण्याची योजना आखली. त्याने आधी विशालला बोलावून एका निर्जन भागात भेटण्यास सांगितले, नंतर त्याला गोळ्या घालून मृतदेह जवळच्या तलावाच्या काठावर असलेल्या एका लहान खड्ड्यात पुरला.

रोहितने ‘दृश्यम’ हा चित्रपट अनेक वेळा पाहिला होता. कुटुंबाची दिशाभूल करण्यासाठी त्याने मृत विशालच्या मोबाईलवरून त्याच्या घरी काही एमएमएस पाठवले आणि सांगितले की तो संवरिया सेठला भेटण्यासाठी इंदूरला जात आहे. त्यानंतर रोहित संवरिया सेठही विशालचा मोबाइल घेऊन गेला. त्याला वाटले की जर विशालच्या मोबाईल फोनचे लोकेशन ट्रेस केले तर ते बाहेरून असेल. यानंतर तो खुदाईलला आला, पण बरेच दिवस सतत पाऊस पडत होता. त्याला वाटले की मृतदेह पाण्यात लवकर कुजेल.

मीठामुळे घटना उघडकीस आली

आरोपी रोहित गावात आला आणि त्याने अनेक क्विंटल मीठ विकत घेतले. मृतदेह मिठात पुरण्यासाठी परिसरातील दोन कामगार बबलू खडपा आणि सोनू परमार ना ४०,००० रुपये दिले. त्यांनी मृतदेह व्यवस्थित पुरला, आरोपींकडून ४०,००० रुपये घेतले आणि निघून गेले. पुढे त्या कामगारांनी दारूच्या नशेत ही घटना एकाला सांगितली. ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. यानंतर ही घटना उघडकीस आली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!