”मातोश्री’च्या गेटवर घामाघूम…’, गुजरात दंगलीनंतर बाळासाहेबांनी अमित शाहांना कसं वाचवलं? राऊतांचा गौप्यस्फोट

राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेल्या, ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज म्हणजेच, शनिवारी, 17 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिरात प्रकाशन पार पडणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना पक्षध्यक्ष उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या पूर्वीच पुस्तकातील मजकूर चर्चेत असून राऊत यांनी पुस्तकामधून अनेक जुने-नवे किस्से सांगितले आहे. आर्थर रोड तुरुंगामध्ये राऊत यांना नेलं जात असताना शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एका फोन कॉलवरुन कसं वाचवलं होतं याबद्दलची आठवण झाल्याचं पुस्तकात म्हटलं आहे. अमित शाहांना बाळासाहेबांनी कसं वाचवलं होतं याचा पूर्ण किस्साच राऊतांनी पुस्तकात सांगितला आहे.
लहान जय शाहला घेऊन
“अमित शाह यांना ‘मातोश्री’ने म्हणजेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली मदत कोणत्याही कायद्याच्या चौकटीत बसत नव्हती. अमित शाह गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते. केंद्रात यूपीएचे सरकार होते आणि दांगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. त्यामुळे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांनाही आपल्या चेल्याला हवी तशी मदत करता येत नव्हती. गुजरातमधील शाह हे तडिपार होते. सीबीआयने फास आवळत आणल्यामुळे त्यांच्या तात्पुरत्या जामिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. शाह तेव्हा तरुण होते आणि त्यांची दाढी काळी होती. यामध्ये एखच माणसू मदत करु शकतो; ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे शाह यांना कोणीतरी सुचवले. एके दिवशी भरदुपारी ते लहान जय शाहला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले. विमानतळावरुन काळी-पिवळी टॅक्सी पकडून ते वांद्राच्या दिशेने निघाले. शाह यांनी ड्रायव्हरला मातोश्रीच्या मुख्य गेटवर सोडायला सांगितले. मात्र त्यावेळी संपूर्ण कलानगर परिसराला पोलीस धावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. कलानगर मुख्य गेटवरच अमित शाह यांना अडवून ठेवण्यात आले,” असा दावा राऊत यांनी केला आहे.
शाहांनी दर्दभरी रोमांचक कहाणी बाळासाहेबांना सांगितली
“मी गुजरातचा भाजपाचा आमदार आहे. मात्री मंत्री आहे. मला अर्जंट साहेबांना भेटायचे आहे,” असे शाहांनी गेटवर सांगितले. परंतु हा निरोप आत जात नव्हता. कारण त्या वेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती. अमित शाह घामाघूम होऊन बाहेर बराच काळ प्रतीक्षेत होते. आतून प्रतिसाद नव्हता, असे त्या वेळेचे मातोश्रीचे सुरक्षा अधिकारी सांगतात. दुसऱ्या दिवशी आमित शाह पुन्हा मातोश्रीवर पोहोचले आणि त्यादिवशी ते मुख्य गेटवरुन ड्रम गेटपर्यंत पोहोचू शकले. त्या गेटवरुन दिलेला निरोप शिवसेनाप्रमुखांपर्यंत पोहोचला. “गुजरातचे एक आणदार त्यांच्या मुलासह आले आहेत. अडचणीत आहेत. भेट मागत आहेत. या निरोपावर शिवसेनाप्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली. संध्याकाळी अमितभाई मातोश्रीवर गेले. गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी रोमांचक कहाणी शिवसेनाप्रमुखांना सांगितली. “मी अचडणीत आहे. अमुक अमुत न्यायमूर्तींसमोर केस सुरु आहे. तडिपार आङे वगैरे…”, “मी काय करु?” (असं बाळासाहेबांनी विचारलं.) “आपण बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे… तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत,” (असं अमित शाह म्हणाले.)” असं घटनाक्रम सांगताना राऊत यांनी म्हटलं आङे.
बाळासाहेबांचे शेवटचे वाक्य होते…
“बाळासाहेबांनी शांतपणे चिरुटाचा झुरका मारला. धूर सोडला. अमित शाहांकडून विषय समजून घेतला. बाळासाहेबांनी त्यानंतर एक महत्त्वाचा फोन कुणाले केले हे सांगणं नैतिकतेला धरुन नाही. अमित शाह यांचे प्रकरण ज्यांच्याकडे होते त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरुन बाळासाहेब ठाकरे थेट बोलले. त्यांचे शेवटचे वाक्य होते, “तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा, पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरु नका!” असं राऊतांनी पुस्तकात लिहिलं आहे.
बहुतेक अडचणी दूर झाल्या
“त्या एका फोनने अमित शाहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या. त्याच अमित शाहांनी पुढे काय केले, ते साऱ्या जगाने पाहिले. शिवसेना व ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृणपणे वागले. ईडी कोठडी संपवून न्यायलयीन कोठडी म्हणजे आर्थर रोड जेलच्या दिशेने जाताना हे सगळं मला आठवत होतं,” असं राऊतांनी म्हटलं आहे.