अकोल्यात मध्यरात्री रेल्वे स्टेशन चौकात युवकावर चाकू-लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला!

अकोला : अकोल्यात मध्यरात्री भीषण प्रकार घडला असून रेल्वे स्टेशन चौकात एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. आदित्य मानवटकर असं या गंभीर जखमी युवकाचं नाव असून आर्थिक व्यवहारातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिलीय.
हल्लेखोरांनी आदित्यवर चाकू आणि लोखंडी पाईपने हल्ला चढवला. या भीषण प्रकारामुळे परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
घटनेनंतर काही स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत आदित्यला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला असून हा हल्ला आर्थिक वादातून झाल्याचा प्राथमिक संशय आहे. मात्र, अद्याप आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
अकोला शहर पोलीस अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे.