ऑपरेशन सिंदूर’ च्या यशानंतर भारतीय संरक्षण दलांच्या सन्मानार्थ नांदगाव पेठ येथे भव्य आयोजन
नांदगाव पेठ : जम्मू कश्मीर मधील #पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात पर्यटनासाठी गेलेल्या अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून #ऑपरेशन_सिंदूर राबवले व दहशतवाद्यांच्या ठिकाण्यांवर हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानला चांगला धडा शिकवला. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिनांक १८ मे २०२५ रोजी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ येथे भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज जी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित भव्य “तिरंगा रॅली” चे आयोजन करण्यात आले असता, या तिरंगा रॅलीत सहभागी होऊन ‘भारत माता की जय, जय हिंद’…….”हम जियेंगे और मरेंगे, ऐ वाटण तेरे लिये” अशा घोषणांनी भारतीय लष्कराचा विजयोत्सव साजरा केला.
यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, माजी मंत्री राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे, माजी खासदार नवनीत जी राणा, मा.जिल्हाध्यक्ष निविदिताताई चौधरी, धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप दादा अडसड, वरुड मोर्शी मतदार संघाचे आमदार उमेश भाऊ यावलकर, तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ वानखडे, मा. शहराध्यक्ष किरण भाऊ पातुरकर, अमरावती जिल्हा तिरंगा यात्रेचे संयोजक राजेश्वरी निस्ताने, सहसंयोजक तात्यासाहेब मेश्राम, नरसिंग भाऊ, सचिन इंगळे (पश्चिम विदर्भ युवा प्रमुख, ओबीसी मोर्चा), अमित बाबुळकर (मा. शहराध्यक्ष, भाजपा तिवसा) दिनेश सुंदरकर, अनुप भगत, मनोज खवळ (शहराध्यक्ष वलगाव), प्रवीण शेंदरकर अंकुश चौधरी, संतोष मटिया, मोरेश्वर मुळे, अमोल व्यवहारे, विवेक गुल्हाने नितीन गुडदे, राजूभाऊ हजारे, प्रवीण राऊत, एड.जयंतराव ढोके, इकबाल हुसेन, विजय गाडगे, सागर माहुरे, श्याम नरखेडकर, उमेश श्रीखंडे, सुभाष श्रीखंडे, सौ. अनिताताई तिखिले, सौ. साधनाताई म्हस्के, सौ. प्रनिताताई शिरभाते, सौ. मीनाताई श्रीराव, सौ. वर्षाताई गाडगे, सौ. अनिताताई लांजेवार, सौ. वर्षाताई काळमेघ, सौ. भारतीताई महाजन तसेच अमरावती जिल्ह्यातील २१ मंडळातील तालुकाध्यक्ष सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी सचिन शेंदरकर, संतोष शेंदरकर, गणेश चापके व अन्य माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहलगाम हल्ल्यामध्ये निरपराध असे पर्यटक शहिद झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तानवर जबरदस्त प्रहार करून विजय मिळविला आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये ज्या ज्या सैनिकांनी आपली शक्ती पणाला लावली अशा सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्याच्या सन्मानार्थ आज दिनांक १८ मे रोजी नांदगाव पेठ भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. देशासाठी अहोरात्र झटणारे सैनिक आमची आण-बाण-शान आहे. त्यांच्या सन्मानासाठी आम्ही सदैव तत्पर असून देशाचा तिरंगा हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे या तिरंगा रॅलीमध्ये आम्ही फक्त देशाचा तिरंगा हाती घेऊन देशभक्तीची भावना जागृत करण्याचे कार्य या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून केले, असे प्रतिपादन यावेळी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी केले.