चक्रीवादळाचा कहर! सावरा-मंचनपूर परिसरात वीज कोसळून जनावरे ठार

अकोट: 17 मे रोजी दुपारी सावरा व मंचनपूर परिसरात आलेल्या अचानक वादळी वाऱ्याच्या झंझावातात गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. चक्री वादळासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतशिवार, घरे, जनावरे यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तीन बैलांचा मृत्यू, पत्रे उडाले, झाडे कोसळली
अमोल गजानन वानखडे (चिंचोणा) यांच्या शेतातील दोन पांढऱ्या बैलांवर विज कोसळल्याने जागीच मृत्यू.
संदीप विश्वास चौधरी (मंचनपूर) यांच्या गोठ्याची भिंत कोसळून एक बैल जागीच ठार, दुसऱ्याला उपचारादरम्यान मृत्यू.
घरावरील टिन पत्रे, लोखंडी पाइप व केबल तार दूरवर उडून गेल्या.
अनेक मोठ्या झाडांची पडझड व विजेच्या तारांचे खांब कोसळले.
घरांचे मोठे नुकसान
संघदीप पंडित तायडे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) यांचे पक्क्या घरावरील सर्व छप्पर उडाले.
शब्बीर अली यांच्या चार खोल्यांचे छप्पर पूर्णपणे उडून गेले, अन्नधान्य व घरातील साहित्य भिजून नुकसान.
सरासरी १ ते २ लाख रुपयांचे नुकसान प्रत्येकी.
शेतीचीही हानी, अंधाराने ग्रासले गाव
बागायती पिकांचे मोठे नुकसान, झाडे जमिनीवर कोसळली.
वीज पुरवठा खंडित झाल्याने गावात रात्रभर अंधार.
सावरा सब स्टेशनच्या लाईनवर मोठे नुकसान, लाईन सुधारण्यासाठी तांत्रिक अडचणी.
अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट
पटवारी सौ. सविता पाटील व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पवार यांनी नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा केला.
सरपंच पती वैभव गुजरकर, उपसरपंच धीरज गीते आणि गावातील इतर नागरिकांनी पाहणी केली.
नागरिकांची मागणी – नुकसान भरपाई द्या!
वादळामुळे झालेल्या भीषण नुकसानीमुळे संपूर्ण गाव भयभीत व आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे. नागरिकांकडून सरकारकडे नुकसान भरपाईची जोरदार मागणी करण्यात येत आहे.