नागपूरमध्ये जुना वादातून खून ! बेल्टने मारहाण नंतर चाकूने वार करून हत्या

नागपूर : नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाणे हद्दीत १९ मे रोजी एक धक्कादायक खूनाची घटना घडली. मृतकाचं नाव आहे फारुख उर्फ सोनू चुटी आमीन शेख, वय २९ वर्ष, राहणार देवी नगर. फिर्यादी मोहम्मद मुस्तफा उर्फ गोलू वर्ल्ड ईसा अन्सारी यांच्या माहितीनुसार, मृतक फारुख आपल्या मित्रांसोबत भिलगाव येथील जिल्हा परिषद शाळेजवळ सिद्धांत चौधरी यांच्या गाईच्या गोठ्यासमोर सिमेंट रोडवर बसलेला होता.
त्याचवेळी आरोपी स्वप्निल सारंगपुरे आपल्या ५ ते ६ साथीदारांसह तेथे पोहोचला. दोघांमध्ये पूर्वीचा जुना वाद होता. याच जुन्या वैमनस्यातून वादावादी सुरू झाली. मृतक फारुख शेख याला वाटत होतं की स्वप्निलने त्याची बॅग लिफ्टिंग प्रकरणात पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे फारुखने संतापून आरोपीवर बेल्टने हल्ला केला. यावर संतप्त झालेल्या स्वप्निलने जवळील धारदार चाकूने वार करत फारुखचा जागीच खून केला. या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 189(2), 190, 191(3) आणि BNS सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आणि स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. यशोधरानगर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलं आहे.