LIVE STREAM

AmravatiLatest News

भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची तिरंगा रॅली..

अमरावती : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिलला झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्य दलाने “ऑपरेशन सिंदूर ” मोहीम राबवून बदला घेतला आहे. यामोहिमेत शाहिद झालेल्या सैनिकांच्या समरणार्थ व भारतीय सेनेच्या सन्मानार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. संत गाडगेबाबा समाधी मंदिर येथून प्रारंभ झालेल्या तिरंगा रॅली ला महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य आमदार संजय खोडके व आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. त्यानंतर राष्ट्रवादी च्या तिरंगा रॅलीत सहभागी सहकार्यांनी *भारत माता की जय .. वंदे मातरम व भारतीय सैन्य दलाचा विजय असो , अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

तिरंगा रॅली इर्विन चौक स्थित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर येथे पोहोचताच महामानवास हारार्पण करण्यात आले. तसेच मोमबत्ती प्रज्वलित करून ऑपरेशन सिंदूर मोहिमेत शाहिद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्याचबरोबर पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिल्या बद्दल भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ जयघोष करण्यात आला.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संकेत बोके यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैनिकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करीत देशभक्ती व राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यात आला. यावेळी तिरंगा रॅली मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष (शहर ) ऋतुराज राऊत , प्रदेश उपाध्यक्ष आकाश हिवसे , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश बोके, प्रदेश सरचिटणीस संकेत अळसपुरे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव मयूर झांबानी, त्याचबरोबर अंकित दहीकर , मनीष पेठे, श्रीकांत झंवर ,गौरव अढाऊ, सार्थक खोरगडे , अभिषेक हजारे, ओम बिजारे , बादल काळे , निखिल आखरे, सारंग देशमुख, हिमांशू गुप्ता, पराग राऊत, ऋतुराज साबळे, अभिजित लोयटे , आदित्य गुप्ता , पंकज शर्मा , प्रतीक पाटेकर , श्रवण भोरे, अथर्व महल्ले , सुजल तेलखडे , सागर इंगळे, विनीत भाटीया , वैभव मोरे,अनुराग वैराळे , स्मित माथुरकर, फिरोज भाई मेकॅनिक , राहुल वाघ, ऋषी गाडगे , मनीष पाटील , जयेश सोनोने , उज्वल पांडे, जय गोगे , आदीसंह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!