LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

⁠सरन्यायाधीश हे आंबेडकरी आहेत, म्हणूनच अपमान करण्याचा प्रयत्न; नाना पटोले संतप्त, कारवाईची मागणी

मुंबई : देशाचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेल्या भूषण गवई यांचा काल मुंबईत बार कौन्सिलतर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यातून त्यांनी आपला भूतकाळ आणि संघर्ष काळाती आठवणी जागवल्या. अमरावती जिल्ह्याच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती ते देशाचे सरन्यायाधीश हा प्रवास उलगडताना ते भावूक झाले होते. तर, त्यांच्या मातोश्रींनाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, याच कार्यक्रमातून सरन्यायाधीशांनी राज्याच्या पोलीस प्रमुखांचे, मुख्य सचिवांचे आणि मुंबई पोलीस आयुक्तांचे कान टोचले. त्यानंतर, धावत पळत हे तिन्ही अधिकारी प्रोटोकॉलनुसार सरन्यायाधीशांच्या स्वागताला पोहोचले होते. त्यावरुन, आता काँग्रेस नेत्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे आमदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरन्यायाधीशांचा अवमान केल्याबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त केला.

मुंबई विधानभवन परिसरात लागलेल्या आगीच्या घटनेवरुन नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. महाराष्ट्रालाच आग लागली आहे, ⁠त्यामुळे विधान भवनचा प्रश्नही गंभीर आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले. तसेच, सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या नाराजीवरुन त्यांनी भूमिका मांडली. काल सरन्यायाधीश यांचा जो अवमान केला आहे, ⁠तो चिंताजनक आहे. ⁠महाराष्ट्र यांनी विकला आहे, हे ⁠महाराष्ट्राची अब्रु काढायला लागले आहेत. ⁠सरकार यावर कारवाई काय करणार का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. तसेच, ⁠सरन्यायाधीश हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासोबत प्रोटोकॉल न पाळल्याने संताप व्यक्त केला. तर, महाराष्ट्रात ⁠फुले चित्रपट हा टॅक्स फ्री केला पाहिजे, तरच हे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे आहेत, असं म्हणता येईल, असेही नाना पटोले यांनी म्हटलं.

अनिल देशमुख यांनीही व्यक्त केला संताप

मुंबईत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्यातर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला. मात्र या सत्कार सोहळ्याला राज्याच्या तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यांची म्हणजेच मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (DGP) आणि मुंबई पोलीस आयुक्त यांची अनुपस्थिती होती. या गैरहजेरीबाबत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नाराजी व्यक्त करत म्हटले की, “जेव्हा महाराष्ट्रातीलच एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश म्हणून राज्यात पहिल्यांदा येतो, तेव्हा या कार्यक्रमाला उपस्थित राहणे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव, DGP आणि पोलीस आयुक्त यांना योग्य वाटत नसेल, तर त्याबाबत त्यांनीच विचार केला पाहिजे,” असे म्हटले. या प्रकरणावर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत संबंधित अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!