LIVE STREAM

AmravatiCity CrimeLatest News

ATM वापरताय? तर सावधान व्हा! अमरावतीत ATMमध्ये ऍल्युमिनियम प्लेट फसवून चोरी, घटना CCTV मध्ये कैद

अमरावती – शहरातील मध्यवर्ती वर्दळीच्या चित्रा चौकात असलेल्या ॲक्सिस बँकच्या एटीएममध्ये चोरट्यांनी अ‍ॅल्युमिनियम प्लेट लावून रोकड लांबवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सीसीटीव्हीत स्पष्टपणे कैद झाला असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकारात चोरटे एटीएम मशीनमध्ये अ‍ॅल्युमिनियम प्लेट लावून ग्राहकांचे पैसे अडकवतात आणि नंतर मशीनमध्ये हस्तक्षेप करून ती रोकड काढतात. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

9 दिवस उलटूनही आरोपी मोकाट
ही घटना घडून 9 दिवस उलटून गेले असले तरी अजूनही चोरीचा प्रयत्न करणारे आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे शहरातील ATM सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोलीस बाईट:

“ATM मध्ये अ‍ॅल्युमिनियम प्लेट लावून रोकड चोरण्याचा प्रकार समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही तपास करत आहोत. नागरिकांनी एटीएममध्ये पैसे काढताना सावध राहावं आणि संशयास्पद बाब लक्षात आल्यास त्वरित पोलीस किंवा बँकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.”
– मनोहर कोटनाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस स्टेशन

नागरिकांना सूचना:
एटीएम मशीनमध्ये पैसे अडकले तरी बाहेर पडत नसल्यास शक्यतो दुसऱ्याच वेळी प्रयत्न करू नका.

मशीनमध्ये कुठलीही अतिरिक्त प्लेट, स्क्रू, किंवा साधारणपेक्षा वेगळी रचना आढळल्यास त्वरित बँक आणि पोलिसांशी संपर्क करा.

शक्यतो CCTV असलेल्या आणि गार्ड उपलब्ध असलेल्या ATM चा वापर करा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

This will close in 21 seconds

error: Content is protected !!