अचलपुर तहसील अंतर्गत पथ्रोट महसूल मंडळ स्तरावर छत्रपती श्री.शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन…
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत जिल्हा वार्षिक योजना संबंधित महसूल विभागांतर्गत राज्यातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्याचे शासनाचे धोरणाचे अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजनेमधून ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ अंतर्गतमेळघाट विधानसभा मतदार संघातील आचलपूर तहसील अंतर्गत पथ्रोट महसूल मंडळ स्तरावर आमदार केवलराम काळे पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन पथ्रोट येथील उषाई मंगल कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी बळवंत आरखराव साहेब, यांचे प्रमुख उपस्थिती करण्यात आले होते . या शिबिराला नागरिकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नागरिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न या निमित्ताने निकाली निघाले.या वेळी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्याला दाखले देण्यात आले .
शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये नागरिकांचे प्रलंबित प्रश्न याबाबत या शिबिरामध्ये तत्काळ निर्णय घेऊन त्यांचे कामे मार्गी लावण्यात आले.
यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड यांचे वाटप, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजना इत्यादींचा लाभ देण्यात येईल. तसेच या अभियानांतर्गत जिवंत सात-बारा प्रकारने, प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे व विविध शासकीय योजनासाठी लागणारे दाखले अशा महसूल विभागाच्या विविध योजना आदींबाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज प्रामुख्याने पार पाडण्यात आले.
ज्या लाभार्थ्यांच्या KY C झालेली नाही त्यांना तात्काळ KY C करून देण्यात आली. व शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड यांचे वाटप, संजय गांधी निराधार योजना, लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या अभियानांतर्गत महसूली प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्याच्या सूचना सर्व महसुली अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या असून या सुविधा नंतर प्रलंबित प्रकरणांची अद्यावत माहिती आमदार महोदयांना सादर करून त्यावर सुद्धा निर्णय घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी बळवंत आरखराव साहेब,
अचलपुर तहसिलदार गरकल साहेब,सरपंच नंदाताई राऊत , नायब तहसिलदार श्रीराव साहेब, पुरवठा अधिकारी केदारे साहेब ,भाजपा तालुकाध्यक्ष समीरजी हावरे ,APMC संचालक अतुलभाऊ वाढ,सुधीरभाऊ रसे, जानरावजी हागे,वाघमारे काका,रितेशभाऊ नवले,अमोलभाऊ जाधव,नितीनभाऊ गोरले,
अविनाश यावले,आप्पासाहेब चित्रकार,मनोजभाऊ वडतकर,
सारडे सर,आकाश खैरकर,उत्तम मोडक यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.