छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ग्रीन रन मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदुरबाजार – स्वराज्यवीर छत्रपती शंभूराजे जयंती पर्वानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय “ग्रीन रन मॅरेथॉन” स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. दिनांक 21 मे 2025 रोजी सकाळी 6 वाजता ही स्पर्धा गो.सी.टोम्पे महाविद्यालय, चांदूरबाजार येथून प्रारंभ झाली.
या स्पर्धेचे आयोजन संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी, तालुका शारीरिक शिक्षक संघटना, गो.सी. टोम्पे महाविद्यालय, तालुका डॉक्टर्स असोसिएशन आणि माऊली स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
एकूण 11 किमी अंतराच्या मुख्य मॅरेथॉनमध्ये विदर्भातील तब्बल 240 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत ४ वेगवेगळ्या वयोगटांमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या –
पुरुष खुला गट – 11 किमी
14 वर्षांखालील मुले – 1 किमी
14 वर्षांखालील मुली – 1 किमी
डॉक्टर्स, शिक्षक व कर्मचारी गट – 1 किमी
🏆 विजेते पुढीलप्रमाणे :
🔹 खुला गट (11 किमी)
🥇 सौरभ तिवारी (नागपूर) – 34.37 मिनिटे – ₹11,000 रोख
🥈 नागराज खुरसने – ₹5,000 रोख
🥉 पीयूष मसाने – ₹3,000 रोख
🔹 14 वर्षांखालील मुले (1 किमी)
🥇 चि. रुद्र निस्ताने – 2.47 मिनिटे
🥈 चि. सोहम जाधव
🥉 चि. अनुज दळवी
🔹 14 वर्षांखालील मुली (1 किमी)
🥇 कु. संस्कृती पळसपगार
🥈 कु. कार्तिकी धरपाळ
🥉 कु. श्रावणी भटकर
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:
कार्यक्रमात माजी आमदार बच्चू कडू, गो.सी. टोम्पे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्करराव टोम्पे, छत्रपती पुरस्कार प्राप्त नितीन चव्हाळे सर, प्राचार्य राजेंद्र रामटेक, देशमुख सर, उईके सर, डॉ. तुषार देशमुख, पारधी सर, वरिष्ठ पत्रकार मदनराव भाटे, नागले सर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या स्पर्धेत विद्यार्थी, नागरिक, पालक व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला. पर्यावरणपूरक संदेश देणाऱ्या या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीची जाणीव देखील वृद्धिंगत झाली.